नवी दिल्ली: मोदी सरकारवर टीका करताना सोनिया गांधींना आपण नेहमीच पाहतो. पण यावेळी मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी यूपीए सरकारवरच टीका केली आहे.
यूपीए सरकार येऊन 2 वर्ष झाली पण कोणतेच प्रयत्न होत नसल्याचं सोनिया म्हणाल्या. त्यामुळे त्यांना टीका तर मोदी सरकारवर करायची होती, पण बोलता बोलता त्यांनी यूपीएचंच नाव घेतलं. तसंच पंतप्रधान हे दुसऱ्यांना भेटायला घाबरतात असंही सोनिया म्हणाल्या आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधताना सोनिया गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.