रांची: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी गोत्यात आला आहे, पण याला क्रिकेट जबाबदार नाही, तर धोनीचं कार प्रेम त्याला भोवलं आहे.
हमर-2 ही धोनीची गाडी रांचीच्या वाहतूक विभागानं चुकून स्कॉरपियो म्हणून रजिस्टर केली. ही चूक लक्षात आल्यानंतर आता धोनीला याचा आत्तापर्यंतचा टॅक्स आणि दंड भरावा लागणार आहे.
हमर ऐवजी स्कॉरपियोचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळे धोनीनं चार लाखांऐवजी फक्त 53 हजार रुपये रजिस्ट्रेशन चार्ज भरले होते. 2009 मध्ये हे रजिस्ट्रेशन झालं होतं.
टायपिस्टनं हे रजिस्ट्रेशन इंटरनेटवर केलं, पण त्यावेळी गाड्यांच्या ऑप्शनमध्ये हमर ही गाडी नव्हती. आंतरराष्ट्रीय गाडी असल्यानं हमर चा ऑप्शन तिथे उपलब्ध नव्हता, म्हणून टायपिस्टनं स्कॉरपियो गाडीचं रजिस्ट्रेशन केलं असण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.