५२ वर्षांच्या मुलानं २८ वर्षांच्या पित्याला दिला मुखाग्नि!

एक ५२ वर्षीय मुलगा आपल्या २८ वर्षीय पित्याला अग्नी देतोय... भारतात कदाचित अशी घटना पहिल्यांदाच घडत असेल...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 2, 2013, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंदीगड
एक ५२ वर्षीय मुलगा आपल्या २८ वर्षीय पित्याला अग्नी देतोय... भारतात कदाचित अशी घटना पहिल्यांदाच घडत असेल...
हरियाणाच्या मीरपूर गावातील रामचंद्र यादव यांच्या सैनिक पित्याचं – हवालदार जगमाल सिंह यांचं - शव तब्बल ४५ वर्षानंतर बर्फाच्छिदित अवस्थेत सापडलंय.
आपल्या पित्याचं शव आपल्याला कधी पाहायला मिळू शकतं याची आशाही रामचंद्र यादव यांनी आत्तापर्यंत सोडून दिली होती. पण, तब्बल ४५ वर्षानंतर का होईना त्यांना त्यांच्या पित्याच्या मृत शरीराला मुखाग्नि देण्याची संधी मिळालीय. काही दिवसांपूर्वी सैनिकांना लेहच्या जवळच जगमाल सिंह यांचं शव सापडलं होतं.
फेब्रुवारी १९६८ मध्ये लेह जवळील रोहतांग पास जवळ झालेल्या अपघातामध्ये १०२ जणांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेतील अनेकांचे मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत. परंतु, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने नुकत्याच राबवलेल्या एका शोध मोहिमेमध्ये हलविंदर जगमाल सिंग या सैनिकाचा मृतदेह सापडलाय. ईएमई (संदेशवहन) विभागाकडील लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आणि या मृतदेहावरील कपड्यांच्या खिशात हलविंदरच्या कुटुंबाची चिठ्ठी सापडल्याने मृतदेहाची ओळख पटू शकली.
रामचंद्र सिंग म्हणतात, ‘मी तेव्हा केवळ सहा वर्षांचा होतो जेव्हा माझ्या पित्याच्या मृत्युची बातमी आली होती. आता मी ५२ वर्षांचा झालोय... आणि माझ्या हाती माझ्या २८ वर्षांच्या पित्याचा मृतदेह हाती पडलाय’.

कसा झाला होता हा अपघात...
एएन १२ हे एक चार इंजिनचे मालवाहू विमान होते. सोव्हिएत युनियनमध्ये (रशिया) बनवण्यात आलेल्या या विमानाने १९६८च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चंढीगडच्या एअरबेसवरुन लेहच्या दिशेने उड्डान केले. या विमानात ९८ जवानांसहीत चार वैमानिक लेहमध्ये आपल्या कामावर रुजू होण्यास निघाले होते. मात्र अर्धा प्रवास केल्यानंतर जम्मू कश्मीरमधील वातावरणाचा अंदाज घेऊन फ्लाइट लेफ्टनंट एच के सिंग यांनी विमान परत फिरवण्याचा निर्णय घेतला.
एएन १२ ने रोहतांग पासच्या रेडिओ केंद्राशी शेवटचा संपर्क साधला होता. हा अपघात २००३ पर्यंत एक रहस्यच होता. मात्र २००३ साली एका गिर्यारोहकांच्या टीमला चंद्रभागा पर्वत रांगामधील लाहाहूल आणि स्पीटी येथील परिरात ढाका ग्लेशियरमध्ये या विमानाचे अवशेष सापडले. तेव्हापासून २००३ ते २००९ या सहा वर्षाच्या काळात वेगवेगळ्या शोध मोहिमांमध्ये फक्त चार जवानांचे मृतदेह सापडले आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.