रात्री पेट्रोलपंप राहणार सुरूच, मोईलींची सूचना फेटाळली

पेट्रोलची मागणी कमी करण्यासाठी पेट्रोल पंप रात्री आठ ते सकाळी आठ या काळामध्ये बंद ठेवण्याबाबतच्या सूचना पेट्रोलियमंत्री विरप्पा मोईली यांनी दिल्या होत्या. मात्र या सूचना पंतप्रधान कार्यालयानं फेटाळल्या आहेत. त्यामुळं आता पेट्रोलपंप रात्रीही सुरू राहतील.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 2, 2013, 12:26 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
पेट्रोलची मागणी कमी करण्यासाठी पेट्रोल पंप रात्री आठ ते सकाळी आठ या काळामध्ये बंद ठेवण्याबाबतच्या सूचना पेट्रोलियमंत्री विरप्पा मोईली यांनी दिल्या होत्या. मात्र या सूचना पंतप्रधान कार्यालयानं फेटाळल्या आहेत. त्यामुळं आता पेट्रोलपंप रात्रीही सुरू राहतील.
पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टिकोनातून रात्री पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयानं फेटाळल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
सरकारनं इंधन आयातीमध्ये कपात करण्याचा प्रयत्न सुरू करण्याबाबत विचार सुरू केलाय. त्यामुळंच रात्री आठ ते सकाळी आठ पेट्रोलपंप बंद ठेवण्याबाबत काल विरप्पा मोईलींनी म्हटलं होतं. विरोधी पक्षांनी त्यांच्या या प्रस्तावावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज पंतप्रधान कार्यालयाकडून पेट्रोलपंप सुरूच राहणार असल्याची माहिती मिळतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.