भारतातून दुबईला जाणारी काही विमाने रद्द

दुबई विमानतळावर बुधवारी  विमान अपघात झाला. यानंतर येथील विमानतळ अद्यापही खुले झालेले नाही.

Updated: Aug 4, 2016, 10:03 PM IST
भारतातून दुबईला जाणारी काही विमाने रद्द title=

नवी दिल्ली : दुबई विमानतळावर बुधवारी  विमान अपघात झाला. यानंतर येथील विमानतळ अद्यापही खुले झालेले नाही. भारताने दुबईला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत, तसेच काही शारजा आणि अबुधाबीकडे वळविली आहेत.

 दुबई ते भारत हा सर्वांत व्यस्त विमान मार्गांपैकी एक आहे. हे विमानतळ बंद झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी दुबई विमानतळ प्रशासनाने सध्या केवळ मोठ्या जेट विमानांनाच उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे.