गोव्यात गायक रेमो फर्नांडिसला अटक

सिंगर रेमो फर्नांडिसला अल्पवयीन मुलीला धमकावल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Dec 19, 2015, 12:27 PM IST
गोव्यात गायक रेमो फर्नांडिसला अटक title=

पणजी : सिंगर रेमो फर्नांडिसला अल्पवयीन मुलीला धमकावल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली आहे. 

रेमोच्या मुलानं बेदरकारपणे गाडी चालवली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केलं होतं. दोन डिसेंबरला हा अपघाताचा प्रकार घडला आणि तीन डिसेंबरला रेमोनं या मुलीला धमकावल्याचा प्रकार घडल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 

या मुलीनं तक्रार केल्यानंतर रेमोवर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, रेमोनं या घटनेवर अजूनही काही प्रतिक्रिया दिलेली नाही.