जैतापूरला विरोध करणाऱ्या सेनेची मोदींकडून कान उघडणी

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत. वादग्रस्त जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना चांगलंच खडसावलंय.

Updated: May 14, 2015, 11:17 AM IST
जैतापूरला विरोध करणाऱ्या सेनेची मोदींकडून कान उघडणी title=

नवी दिल्ली : जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत. वादग्रस्त जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना चांगलंच खडसावलंय.

अणुऊर्जेतूनच विकास शक्य आहे. ऊर्जा निर्माण करण्यासाठी अणुऊर्जा हाच मार्ग उरलाय, असं पंतप्रधानांनी सेना खासदारांना सांगितलं. दरम्यान, जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. पंतप्रधानांनी स्थानिक जनतेचा आक्रोश समजून घ्यावा, असा ठाम पवित्रा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय.

जैतापूर लादू नका.. - आदित्य ठाकरेंचं ट्विट
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आघाडी उघडलीय. शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सोशल वेबसाईटवर आपलं म्हणणं मांडलंय. 

'अणुऊर्जा ही ना स्वच्छ आहे, ना हरित ऊर्जा... त्याचे दुष्परिणाम जगात दिसतायत. विकास हवा, पण मानवी जीवन धोक्यात घालून विकास नको. जैतापूरचा धोका स्पष्ट दिसतोय, जैतापूर लादू नका, याबाबत आम्ही आवाज उठवलाय आणि उठवत राहू. जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान अशा अनेक देशांनी हे तंत्रज्ञान नाकारलंय. यूपीए २ सरकारने जैतापूर प्रकल्प स्थानिकांवर लादला, दोघा स्थानिकांचे बळीही घेतले' असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.