हॉटेलमधलं सेक्स रॅकेट पोलिसांनी केलं उद्धवस्त

एका हॉटेलमध्ये एका बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना तिथे सुरु असलेलं सेक्स रॅकेट निदर्शनास आलं. पोलिसांनी जेव्हा हॉटेलमधल्या खोल्यांची चौकशी केली तेव्हा या हॉटेलमधून ५ मुली आणि ३ मुलांना अटक करण्यात आली आहे.

Updated: May 3, 2016, 05:05 PM IST
हॉटेलमधलं सेक्स रॅकेट पोलिसांनी केलं उद्धवस्त title=

बुलंदशहर : एका हॉटेलमध्ये एका बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना तिथे सुरु असलेलं सेक्स रॅकेट निदर्शनास आलं. पोलिसांनी जेव्हा हॉटेलमधल्या खोल्यांची चौकशी केली तेव्हा या हॉटेलमधून ५ मुली आणि ३ मुलांना अटक करण्यात आली आहे.

हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वीच एका मुलीवर बलात्कार झाला होता. त्याच प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना तेथील काही गोष्टी खटकल्या आणि त्यानंतर सेक्स रॅकेट सुरु असल्याचा खुलासा झाला. यानंतर येथील प्रत्येक हॉटेलची पाहणी आणि चौकशी करण्याचे आदेश एसपी यांनी दिले आहे.