शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा

जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे. 

Updated: Aug 24, 2015, 04:43 PM IST
शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा title=

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई: जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे. 

निफ्टी सगळे 50 शेअर्स शुक्रवारच्या तुलनेत 10 टक्क्यांहून अधिक कोसळलेत.  आज सकाळी चीनी युवानचं अवमूल्यन आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या दोन्ही बातम्यांनी बाजाराला घायाळ केलं. त्यानंतर अर्थव्यवस्था मजबूत आहे, घाबरू नका अशी ग्वाही खुद्द रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. पण त्यांच्या काहीही परिणाम झालेला नाही. उलट युरोपियन बाजार उघडल्यावर विक्रीचा जोर आणखी वाढला. दिवस अखेर सेन्सेक 1624 अंकांनी घसरून 25 हजार 741 वर तर निफ्टी 490 अंकानी घसरून 7 हजार 809 वर बंद झाला. या घसरणीमुळे तब्बल सात लाख कोटींचं नुकसान झालंय. 

दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था सध्या मजूबूत स्थितीत असल्यानं घाबरून जाण्याचं कारण नाही, असं रघुराम राजन यांनी म्हणाले. तिकडे अर्थमंत्री अरूण जेटलींनीही बाजार लवकरच स्थिरावतील असा विश्वास व्यक्त केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.