नवी दिल्ली : काश्मीरच्या उधमपूरमध्ये बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर, जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद हा पाकिस्तानचा नागरीक नाहीच, हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी आयएसआय पुरावे नष्ट करण्यासाठी कामाला लागली आहे. नावेदचं नाव फैसलाबादच्या मतदान यादीतून हटवण्यात आलं आहे.
एका रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील निवासी नावेदचं नावं पाकिस्तानच्या मतदार यादीतून हटवण्यात आलं आहे, तसेच त्याच्याशी संबंधित सर्व पुरावे नष्ट करण्याचं काम पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी आयएसआय करतेय.
कसाब मुंबईत जिवंत सापडल्यानंतर कसाबच्या परिवाराला आयएसआयने सुरक्षिततेसाठी ताब्यात घेतलं होतं, नावेदच्या परिवारालाही कुणाशी संपर्क होऊ नये म्हणून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्लान होऊ शकतो असं सांगण्यात येतंय.
नावेदच्या परिवारातील सर्वाचे मोबाईल फोन स्विचऑफ आहेत. भारतीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नावेदला अटक झाल्यानंतर त्याने त्य़ाच्या घरातीला लोकांचे फोन नंबर्स आणि पत्ते दिले होते, मात्र तेव्हापासून हे नंबर स्विच ऑफ असल्याने, आयएसआयने त्यांना ताब्यात घेतले असल्याची शक्यता आहे.
नावेदला अटक केली तेव्हा आपल्याला दोन भाऊ एक बहिण असल्याचं त्याने सांगितलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.