नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं आज सहारा प्रमुख सुब्रतो रॉय सहारा यांना सशर्त जामीन मंजूर केलाय. सुब्रतो रॉय यांना जामीन हवा असेल तर त्यांना तब्बल 10 हजार करोड रुपये परत केल्यानंतरच तो मिळू शकेल, असं शिखर न्यायालयानं म्हटलंय.
10 हजार करोड रुपयांपैकी अर्धी रक्कम नकद आणि अर्ध्या रक्कमेची बँक गॅरंटी दिल्यानंतरच सुब्रतो रॉय तुरुंगातून बाहेर येऊ शकतील. ज्या दिवशी रॉय ही अट पूर्ण करतील त्या दिवशीच ते तुरुंगातून बाहेर येऊ शकतील, असंही कोर्टानं म्हटलंय.
शिवाय, यानंतर 18 महिन्यांच्या आत त्यांना 36,000 करोड रुपयांची उरलेली रक्कमही परत करावी लागेल. ही रक्कम त्यांना नऊ टप्प्यांमध्ये परत करावी लागले... आणि प्रत्येक टप्प्यात दोन महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये, अशीही अट कोर्टानं घातलीय.
पण, ही रक्कम परत करण्यात रॉय यांना अपयश आलं तर त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जाऊ शकतं.
कोर्टानं रॉय यांना पासपोर्ट जमा करण्याचे तसंच देशातून कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहर न जाण्याचे आदेश दिलेत. कोर्टानं त्यांना प्रत्येक 15 दिवसांनी टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करण्याचे आदेश दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.