योग म्हणजे आळशी - श्रीमंतांचे चोचले; मंत्रीमहोदय उवाच

कर्नाटकचे समाज कल्याण मंत्री एच. अंजनेय यांनी बुधवारी एक धक्कादायक विधान केलंय. योग म्हणजे आळशी आणि श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, असं विधान अंजनेय यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकचं काँग्रेस सरकारची मात्र फजिती होऊ शकते. 

Updated: Jun 18, 2015, 09:45 PM IST
योग म्हणजे आळशी - श्रीमंतांचे चोचले; मंत्रीमहोदय उवाच title=

बंगळुरू : कर्नाटकचे समाज कल्याण मंत्री एच. अंजनेय यांनी बुधवारी एक धक्कादायक विधान केलंय. योग म्हणजे आळशी आणि श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, असं विधान अंजनेय यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकचं काँग्रेस सरकारची मात्र फजिती होऊ शकते. 

योग केवळ अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नाही... किंवा ज्यांच्याकडे रोजची अशी कोणतीही कामं नाहीत... जे लोक शेतात दिवसरात्र काम करतात आणि घाम गाळतात अशी लोकांना योगाचा विचार कधी शिवणारही नाही, असं अंजनेय यांनी म्हटलंय. एका स्थानिक शाळेत समाज कल्याण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

उल्लेखनीय म्हणजे, २१ जून रोजी कर्नाटकातलं सिद्धारमैय्या सरकार योग दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी करत आहे. कंतीरवा स्टेडियममध्ये होणाऱ्या या सोहळ्यासाठी अभिनेत्री आणि योगाची नॅशनल ब्रॅंड अॅम्बेसेडर शिल्पा शेट्टीही उपस्थित राहणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.