सत्यम घोटाळा : चार वर्षानंतर सेबीनं 'राजू'वर घातली बंदी...

इंडिया सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड अर्थातच सेबीनं चार वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या कॉर्पोरेट घाटाळ्याची चौकशी पूर्ण केलीय. यावर, निर्णय देताना सेबीनं सत्यम कम्प्युटर्सचा संस्थापक बी रामलिंग राजू आणि इतर चार जणांवर 14 वर्षांची बंदी घातलीय.

Updated: Jul 16, 2014, 09:58 AM IST
सत्यम घोटाळा : चार वर्षानंतर सेबीनं 'राजू'वर घातली बंदी... title=

मुंबई : इंडिया सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड अर्थातच सेबीनं चार वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या कॉर्पोरेट घाटाळ्याची चौकशी पूर्ण केलीय. यावर, निर्णय देताना सेबीनं सत्यम कम्प्युटर्सचा संस्थापक बी रामलिंग राजू आणि इतर चार जणांवर 14 वर्षांची बंदी घातलीय.

बी रामलिंग राजूसोबतच राजूचा भाऊ बी रामा राजू (सत्यमचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक), वलदमणि श्रीनिवास (माजी सीएफओ), जी रामकृष्ण (माजी अध्यक्ष) तसंच व्ही एस प्रभाकर गुप्ता (अंतर्गत ऑडिटचा माजी प्रमुख) यांच्यावर ही बंदी घालण्यात आलीय. 
या पाचही जणांना सेबीनं पुढच्या 14 वर्षांसाठी बाजारातील कोणत्याही व्यवहारात सहभागी होण्यास बंदी घातलीय. सोबतच, विविध ‘सिक्युरिटीज’च्या आर्थिक व्यवहारातून चुकीच्या पद्धतीनं कमावलेले 1849 करोड रुपये व्याजासह परत करण्याचे आदेशही सेबीनं दिलेत. येत्या 45 दिवसांत ही रक्कम या आरोपींना सेबीकडे सुपूर्द करावी लागेल. यावर वार्षिक 12 टक्के व्याजानं हे पैसे परत करावे लागतील. हे व्याज 7 जानेवारी 2009 पासून लागू होईल. 

सेबीनं ‘सत्यम’ घोटाळ्यावर 65 पानांचा आदेश जारी केलाय. यामध्ये, बी राजूसहीत पाच जणांनी केवळ व्यक्तिगत लाभासाठी जाणून बुजून तयार केलेल्या कटानुसार एक पांढरपेशी आर्थिक घोटाळा अंमलात आणला. 

सेबीच्यावतीनं सेबीचा पूर्णकालिक सदस्य राजीव कुमार अग्रवाल यांनी हे आदेश जारी केलेत. बाजारात एक कडक संदेश जाण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी ही कारवाई करणं गरजेचं असल्याचं सांगितलंय.  

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, 7 जानेवारी 2009 रोजी बी राजू याच्याच एका पत्रामुळे हा मोठा घोटाळा समोर आला होता. राजूनं हे पत्र सेबीला लिहित घोटाळ्याची संपूर्ण माहिती दिली होती. त्यानंतर ‘टेक महिंद्रा’ या कंपनीनं ‘सत्यम कम्प्युटर्स’ला टेक ओव्हर करत आपल्यात विलीन केलं होतं. त्यानंतर या कंपनीचं नाव बदलून ‘महिंद्रा सत्यम’ असं करण्यात आलं.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.