नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधल्या सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. पंचायत परिषदेच्या 30 सदस्यीय शिष्टमंडळाला नरेंद्र मोदींना भेटलं. जम्मू काश्मीर राज्यातल्या चार हजार ग्राम पंचायतींचं ही पंचायत परिषद प्रतिनिधीत्व करते.
राजौरी, बारामुल्ला, कुपवारा, पूंछ, अनंतनाग, अशा सततच्या दहशतवादी कारवायांनी ग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतल्या ग्राम पंचायतींचे सरपंचही यावेळी हजर होते. गावांत होत असलेल्या विकासकामांची त्यांनी यावेळी मोदींना माहिती करुन दिली.
सोबतच केंद्राचा निधी गावांना मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी यानिमित्तानं नोंदवली. या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ असं आश्वासन यावर मोदींनी दिलं.