काँग्रेस अस्वस्थ, मनमोहन यांच्यासाठी 'समर्थन यात्रा'

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोळसा घोटाळाप्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. 

Updated: Mar 12, 2015, 11:25 AM IST
काँग्रेस अस्वस्थ, मनमोहन यांच्यासाठी 'समर्थन यात्रा' title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोळसा घोटाळाप्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. 

यावरून काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, सुरूवातीला काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसून आली होती. 

मात्र कोर्टाच्या समन्सविरोधात खुद्द सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनमोहन सिंह यांच्या निवासस्थानापर्यंत 'समर्थन यात्रा' काढलीय.
 
मनमोहन सिंह सच्चेपणाचं उत्तम उदाहरण : सोनिया 

"मनमोहन सिंह हे देशाचे माजी पंतप्रधान आहे. त्यांना फक्त देशातच नाही तर जगभरात ओळखलं जात. मनमोहन सिंह हे सच्चेपणाचं उत्तम उदाहरण आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही पदयात्रा काढली आहे. आम्ही काँग्रेस मनमोहन सिंह यांच्या पाठिशी आहे", असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय.

तसेच "मनमोहन सिंह यांना समन्स बजावल्याने आम्हाला धक्का बसला आहे. पण आम्ही याविरोधात कायद्याने लढू, त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं आहे," अशी प्रतिक्रिया अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.