अफवा पसरल्याने मीठ झालं २०० ते ४०० रुपये किलो

देशभरात मीठाचे दर वाढले

Updated: Nov 11, 2016, 10:19 PM IST
अफवा पसरल्याने मीठ झालं २०० ते ४०० रुपये किलो title=

नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकं एटीएम, बँक, पोस्ट ऑफीसमध्ये रांगा लावतांना दिसत आहेत. पण यानंतर एक वेगळीच अफवा आता समोर येत आहे. देशातील अनेक भागांमध्ये लोकांनी मीठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मीठाचा मोठा तूटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने लोकं महाग मीठ खरेदी करु लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्ये अशी अफवा पसरली की १५ ते १६ रुपयाला मिळणार मीठ २०० ते ४०० रुपयाला विकलं जाऊ लागलं.

लखनऊ, बरेली, दिल्ली, नोएडा आणि देशातील अनेक भागांमध्ये एका अफवेमुळे मीठ खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक जण तर मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करतांना दिसून आले. नोट बदलण्याची रांग सोडून लोकं आता मीठ खरेदी करण्यासाठी रांगा लावू लागले आहेत. मीठाची मागणी अचानक वाढल्याने किंमती ही वाढू लागल्या आहेत.

सरकारने स्‍पष्‍ट केलं आहे की ही फक्त एक अफवा आहे. यामध्ये काहीही सत्य नाही. मीठाची कोणतीही कमकरता झालेली नाही. त्यामुळे जनतेला देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा अफवा आणि आणखी काही अफवा देशात पसरतील त्यावर विश्वास ठेऊ नका.