नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आलीय. पटेल यांचा मासिक पगार नव्वद हजारावरून अडीच लाख रुपये करण्यात आलाय.
त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरच्या पगारामध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. आतपर्यंत डेप्युटी गव्हर्नरपदाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला महिना ऐंशी हजार रुपये पगार मिळत असे. या महिन्यापासून हा पगार सव्वा दोन लाख रुपये करण्यात आला आहे.
दरम्यान, देशात नोटाबंदीनंतरच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीचा यशस्वी सामना केल्याचं बक्षीस म्हणून ही पगारवाढ करण्यात आल्याची टीका सोशल मीडियावर सुरू झालीय.