इंदोर : शिर्डीचे साई बाबा मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वतींच्या विरोधात एका स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहराच्या सुखलिया भागात असणारे साई मंदिराचे संस्थापक चंद्रकांत कुजीर यांनी न्यायालयीन दंडाधिकारी (प्रथम वर्ग) राघवेंद्र भारद्वाज यांच्या न्यायालयात स्वरुपानंद सरस्वतीच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीत 90 वर्षीय शंकराचार्यांच्या विरोधात भारतीय दंड विभागानुसार कलम 153 क (धार्मिक कारणास्तव दोन समाजांमध्ये शत्रुता निर्माण करणं) तसंच कलम 298 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं वक्तव्य करणं) आणि अन्य संबंधीत कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कुंजीर यांचे वकील शैलेंद्र द्विवेदी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयानं तक्रारकर्त्यांचं म्हणणं नोंदवून घेतलंय आणि यासंबंधी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर यासंबंधीचा 7 ऑगस्ट ही तारीख देण्यात आलीय.
शिर्डीचे साईबाबा मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करून शंकराचार्यांनी साईबाबांच्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे अचानक चर्चेत आलेले शंकराचार्य देशातील जनतेच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. याचसंबंधी शंकराचार्यांवर वेगवेगळ्या न्यायालयांत आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.