'मन की बात' मध्ये यंदा सचिन आणि विश्वनाथन आनंद

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' आज खास असणार आहे.

Updated: Feb 28, 2016, 09:55 AM IST
'मन की बात' मध्ये यंदा सचिन आणि विश्वनाथन आनंद title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' आज खास असणार आहे. कारण ओबामांनंतर यंदा पहिल्यांदा या कार्यक्रमात काही खास पाहुणे असणार आहेत.

२७ फेब्रुवारीच्या 'मन की बात'मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बुद्धीबळातील मास्टर विश्वनाथन आनंद आणि काही सुप्रसिद्ध व्यक्तीमत्वं येणार आहेत.

या 'मन की बात' चे प्रक्षेपण आकाशवाणी, दूरदर्शनवर केलं जाणार आहे. यंदाच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात सुरू असणाऱ्या विविध बोर्डांच्या शालेय आणि उच्च माध्यमिक परिक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणाऱ्या ताणाबद्दल बोलणार आहेत.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सरकारच्या युट्यूब चॅनलवरही केले जाईल. हा कार्यक्रम ११ वाजता सुरू होणार आहे.