रुपया घसरला: चीनी युवानच्या अवमूल्यनाचा परिणाम रुपयावर

डॉलरच्या तुलनेत आज रुपयानं दोन वर्षातली नीचांकी पातळी गाठलीय. एका डॉलरसाठी आज सकाळी ६४ रुपये ८५ रुपये मोजावे लागत आहेत. ४सप्टेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच या स्तरावर गडगडलाय. 

Updated: Aug 12, 2015, 10:32 AM IST
रुपया घसरला: चीनी युवानच्या अवमूल्यनाचा परिणाम रुपयावर title=

निनाद झारे, झी मीडिया,मुंबई: डॉलरच्या तुलनेत आज रुपयानं दोन वर्षातली नीचांकी पातळी गाठलीय. एका डॉलरसाठी आज सकाळी ६४ रुपये ८५ रुपये मोजावे लागत आहेत. ४सप्टेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच या स्तरावर गडगडलाय. 

चीनी अर्थव्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी डॉलरच्या तुलनेत चीनी युवानची किमंत २ टक्क्यांनी खाली आणण्यात आलीय. त्यामुळं चीनी युवानच्या अवमूल्यनाचा हा परिणाम आज सगळ्याच आशियाई बाजारांमध्ये बघायला मिळतोय. तसाच तो भारतीय बाजारातही दिसतोय. 

गेल्या काही दिवसांपासून रुपयाची घसरण सुरू होती. ऑगस्टच्या सुरूवातीला जाहीर झालेल्या पतधोरणानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा स्थिरावला होता. काल अचानक चीनी युवानचं अवमूल्यन झाल्यानं त्याचा रुपयालाही फटका बसल्याचं बोललं जातंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.