www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेता मुखिया कांतीलाल भूरिया यांनी राष्ट्रीय स्वंय सेवक संघावर खळबळजनक आरोप केलाय. सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज असते. RSSचे कार्यकर्ते सुंदर आदिवासी मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, असा गंभीर आरोप केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रात याबाबत एक वृत्त देण्यात आले आहे. भूरिया यांनी भाजप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणालेत, RSSचे कार्यकर्ते गावांमध्ये जातात. ते जेवणाच्या बहाण्याने ग्रामीण भागातील घरात घुसतात. त्यानंतर त्यांची नजर तरूण मुलींवर जाते. ते त्यांच्यावर नजर ठेवून त्यांना पळवून नेतात. त्यानंतर त्यांच्यावर हे कार्यकर्ते अत्याचार करतात, असे वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. भूरिया यांनी आदिवासी विकास परिषद आणि अनुसूचित जनजाती विभाग पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे वादग्रस्त विधान केले आहे
हा प्रकार रोखण्यास पोलिसांना अपयश येत आहे. कारण बीजेपीच्या दबाबाखाली पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाही. तसेच गुन्हाही दाखल करत नाहीत. मध्यप्रदेश राज्यात आतापर्यंत गायब तसेच बेपत्ता १२ हजार मुलीपैकी ८ हजार मुली या आदिवासी आहेत.
दरम्यान, RSSचे वनवासी कल्याण परिषदचे संघटन मंत्री प्रवीण डोलके यांनी भूरिया यांना उत्तर देताना म्हटले आहे की, भूरियांचेही कार्यकर्ते अनेक घरांमध्ये गेले आहेत. तसेच भूरियाही जातात. तर RSSचे कार्यकर्ते आणि वकील राजेंद्र बापट यांनी भावना भडकविल्याप्रकणी भूरियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आदिवासी आणि अन्य लोकांमधील संबंध बिघडविण्याचे काम भूरिया यांनी केले आहेत, असे या तक्रारीत म्हटले आहे. याबाबतची सुनावणी उद्या १ ऑगस्टला होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.