चेन्नई : आठ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरातील लोकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तर काहींनी बेहिशेबी पैसा बॅंकांमध्ये जमा केला, तरीही आज अनेकांकडील काळे धन अजून बाहेर पडलेले नाही.
नमक्कल जिल्हातील एका व्यावसायिकाने २४६ रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा केल्या. या रक्कमेवर निम्मा कर त्या व्यक्तीला भरावा लागणार आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कर विभागाचे त्याच्यावर लक्ष होते. इतर सरकारी शाखाही त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या. चौकशीनंतर त्याच्यावर रक्कमेच्या निम्म्या कराची आकारणी करण्यात आली.
त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत हा व्यावसायिक ४५ टक्के कर भरण्यास तयार झाला आहे.
जुन्या नोटा जमा करणारा हा व्यावसायिक नमक्कल जिल्हातील तिरुचेगोडे येथील निवासी आहे. त्याने ही रक्कम इंडियन ओवरजीस बँकच्या एका शाखेत ही रक्कम जमा केली होती.