'रेप तो चलतेही रहेते है' - रेणुका चौधरी

वादग्रस्त वक्तव्य करण्यात सत्ताधारी भाजप नेते आघाडीवर असताना, विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते देखील मागे नाहीत कारण,  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी "रेप तो चलतेही रहते है' अशा शब्दात  बलात्कारावर भाष्य केलं आहे.  बुलंद शहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर त्या बोलत होत्या.

Updated: Aug 9, 2016, 08:21 PM IST
'रेप तो चलतेही रहेते है' - रेणुका चौधरी title=

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य करण्यात सत्ताधारी भाजप नेते आघाडीवर असताना, विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते देखील मागे नाहीत कारण,  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी "रेप तो चलतेही रहते है' अशा शब्दात  बलात्कारावर भाष्य केलं आहे.  बुलंद शहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर त्या बोलत होत्या.

रेणुका चौधरी यांचे हे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेसला उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भोवण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. 

या बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'बलात्कार तर होतच असतात. या घटनेच्या १० ते १२ दिवसांनी त्यांनी कोणाला अटक केली आणि त्याबद्दल त्यांना शाबासकी मिळेल असे वाटत असेल तर असे काहीही होणार नाही.'