मुंबई : 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं १०० रूपयांच्या नोटांची सुरतक्षितता वाढवत विशेष प्रकारच्या नोटा चलनात आणल्या आहेत. या नवीन नोटांची रचना काही प्रमाणात बदलण्यात आली आहे. नोटेच्या नंबर पॅनेलवरील संख्या वाढत्या आकारात असेल.
रिझर्व बँकेने महात्मा गांधी सीरीज - २००५ मध्ये नोटा चलनात आणल्या आहेत. ज्यात संख्यांचं स्वरूप बदलण्यात आलंय. नवीन नोटांवर दोन पॅनेल असतील ज्यात पहिली तीन अक्षरं अल्फा-न्युमरिक असतील तर उरलेल्या पॅनेलवरील संख्या वाढत्या आकारात असेल. या नव्या सुविधेमुळे सामान्यांना खऱ्या आणि खोट्या नोटांमधला फरक सहजच लक्षात येईल, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, २००५ पूर्वी छापल्या गेलेल्या नोटा बदलण्यासाठी आता अवधी वाढवून देण्यात आलाय. ३१ डिसेंबरपर्यंत या नोटा तुम्ही बदलून घेऊ शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.