प्रियांका-रॉबर्टची घेतली लंडनमध्ये भेट; ललित मोदीच्या ट्विटनं काँग्रेस अडचणीत

आयपीएलचा माजी कमिशनर ललित मोदीला मदत पोहचवल्या प्रकरणी विरोधी पक्षानं भाजपला चांगलंच धारेवर धरलं. पण, आता या वादात गांधी कुटुंबीयांचंही नावं पुढे येत आहेत.  

Updated: Jun 26, 2015, 01:38 PM IST
प्रियांका-रॉबर्टची घेतली लंडनमध्ये भेट; ललित मोदीच्या ट्विटनं काँग्रेस अडचणीत title=

नवी दिल्ली : आयपीएलचा माजी कमिशनर ललित मोदीला मदत पोहचवल्या प्रकरणी विरोधी पक्षानं भाजपला चांगलंच धारेवर धरलं. पण, आता या वादात गांधी कुटुंबीयांचंही नावं पुढे येत आहेत. सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर ललित मोदीनं गांधी घराण्याशीही आपले जवळचे संबंध असल्याचं म्हटलंय. 

ट्विटर या सोशल वेबसाईटवरून ललित मोदीनं हा दावा केलाय. लंडनमध्ये असताना प्रियांका गांधी-वडेरा आणि रॉबर्ट बढेरा यांची भेट घेतल्याचं मोदीनं म्हटलंय. त्यानं केलेल्या दाव्यानुसार ही भेट गेल्या वर्षी किंवा त्याच्या पूर्वी झाली होती... आणि तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. 

आपले गांधी घराण्याशी खूप जवळचे संबंध आहेत, असा दावा करणाऱ्या ललित मोदीवर मनी लॉड्रिंगचे आरोप आहेत. मोदीला मदत केल्याच्या आरोपात याअगोदर परदेश मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे अगोदर वादात सापडल्यात. 

मात्र, प्रियांका-रॉबर्ट यांच्या भेटीमागचं उद्देश काय होता? हे मात्र मोदीनं यावेळी स्पष्ट केलेलं नाही. परंतु, यामुळे काँग्रेस अडचणीत आलीय हे नक्की.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात स्पष्टीकरण देताना काँग्रेसनं ललित मोदी आणि प्रियांका-रॉबर्ट यांची भेट हे अगोदरपासूनच ठरवण्यात आलेली नव्हती. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांची भेट अचानक ललित मोदीशी झाली होती... आणि हा काही फार मोठा मुद्दा नाही, असं सांगण्यात येतंय.   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.