५९ बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या टोळीला अटक

आंध्र प्रदेश पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या नऊ जणांनी दोन वर्षात ५९ महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचं चौकशीत पुढं आलंय. या टोळीनं आपला गुन्हा मान्य केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 15, 2014, 01:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चित्तूर
आंध्र प्रदेश पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या नऊ जणांनी दोन वर्षात ५९ महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचं चौकशीत पुढं आलंय. या टोळीनं आपला गुन्हा मान्य केलाय.
ही टोळी तामीळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील जंगलात फिरायला येणाऱ्या जोडप्यांना लुटून महिलेवर सामूहिक बलात्कार करायचे. तसंच महिलांचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो प्रसिद्ध करण्याची धमकीही द्यायचे, असं सालेम जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी वाय. हरिनाथ रेड्डी यांनी सांगितलं.
या टोळीनं गेल्या दोन वर्षात केलेल्या ५९ बलात्कारांपैकी फक्त १६ बलात्कारांच्या तक्रारींच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदी आहेत. या टोळीनं हवालदार जवाहरलाल नाईक आणि होमगार्ड देवेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांनी पलामानेरू जंगलात शोधमोहीम सुरू केली होती. त्यानंतर या टोळक्याला पकडण्यात आलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.