कानपूर: कानपूरमध्ये एका ४ वर्षाच्या मुलीवर तरुणाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.
बलात्कार करणे शक्य झाले नाही, म्हणून त्या नराधमाने चक्क त्यामुलीच्या शरीरावर १७ ठीकाणी चावा काढला.
आईला तिच्या चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला म्हणून, आई बाहेरुन घरात आली आणि तिला हा प्रकार पाहून धक्का बसला.
आईने आरडा-ओरड केली असता गावातील जमावाने आरोपी तरुणाला कानपुरच्या पोलीस स्थानकात नेऊन त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
त्या चिमुरडीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान हा गुन्हा केला असल्याची कबूली त्या आरोपीनं पोलिसांना दिली आहे.