राजीव गांधींच्या मारेकऱ्यावर कारागृहात हल्ला

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यावर जेलमध्ये हल्ला करण्यात आला आहे. एजी पेरारिवलन याच्यावर जेलमध्ये आज हल्ला झाला.

Updated: Sep 13, 2016, 05:40 PM IST
राजीव गांधींच्या मारेकऱ्यावर कारागृहात हल्ला title=

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यावर जेलमध्ये हल्ला करण्यात आला आहे. एजी पेरारिवलन याच्यावर जेलमध्ये आज हल्ला झाला.

पेरारिवलनला दुखापत झाल्याने त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

 ४४ वर्षीय पेरारिवलन याच्यावर जेलमध्ये त्याच्यासोबत असलेला आरोपी राजेश याच्याकडून हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

राजीव गांधी यांच्य हत्येप्रकरणी नलिनी, मुरुगन, पेरारिवलन, रॉबर्ट पायस, जयकुमार, संथन, रवीचंद्रन या सात जणांना दोषी ठरविण्यात आलेले आहे. या सातही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आलेली आहे.