www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा बदलून, तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या तीनही आरोपींची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
ही याचिका राजीव गांधींचा हत्येचा आरोप असलेले मुरुगन, संथन, पेरारिवलन यांनी ही याचिका दाखल केली होती.
राष्ट्रपतींकडे या आरोपींनी अकरा वर्षांपासून दयेचा अर्ज दाखल केला होता. मात्र यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. म्हणून त्यांची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची मागणी आरोपींनी केली होती.
या याचिकेत या आरोपींनी, अकरा वर्षांपासून दयेच्या अर्जावर सुनावणी न होणे म्हणजे, भारतीय संविधानाच्या कलम २१ प्रमाणे जीवन जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.
या याचिकेला केंद्र सरकारकडून विरोधही करण्यात आला होता. संबंधित आरोपी तुरूंगात असतांना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यात आला नसल्याचं कोर्टात म्हटलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.