राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 6 वेळा केला फोन पण...

भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत बसू नये यासाठी शिवसेनेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची राज ठाकरे यांची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रसंगी मुंबई महापालिकेची निवडणूक न लढण्याची होती मासनसिकता राज ठाकरेंनी तयार केली होती. मुंबई वगळता नाशिक, ठाणे, पुणे संपूर्ण ताकदनिशी लढविण्याचा विचार सुरू होता. मात्र उद्धव ठाकरे अनुकूल होत नसल्यानं सगळं बारगळलं.

Updated: Jan 30, 2017, 02:02 PM IST
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 6 वेळा केला फोन पण... title=

मुंबई : भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत बसू नये यासाठी शिवसेनेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची राज ठाकरे यांची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रसंगी मुंबई महापालिकेची निवडणूक न लढण्याची होती मासनसिकता राज ठाकरेंनी तयार केली होती. मुंबई वगळता नाशिक, ठाणे, पुणे संपूर्ण ताकदनिशी लढविण्याचा विचार सुरू होता. मात्र उद्धव ठाकरे अनुकूल होत नसल्यानं सगळं बारगळलं.

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सहा वेळा फोन केला. मात्र उद्धव ठाकरेंकडून कुठलाही प्रतिसाद नाही. बाळा नांदगांवकरांनीही मातोश्रीवर जाऊन केली शिष्टाई तरीही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेकडूनच मनसेकडे युती संदर्भात संवाद सुरू झाला होता.  मात्र अचानक शिवसेनेकडूनच कोणतीही कारणं न देता हा संवाद थांबविण्यात आला.

यंदाही महापालिका निवडणुकीत युती तुटण्याआधी शिवसेनेकडूनच युतीसंदर्भात मनसेकडे सुरू चाचपणी सुरू झाली होती. युतीच्या जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त वेगळ्या स्तरावर सुरू चर्चा झाली. सुमारे पाच बैठका झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. नाशिकमध्ये सहकार्याच्या बदल्यात मुंबईत सहकार्य करण्याची मनसेकडून ग्वाही देण्यात आली होती. मुंबईत जागा किती आणि कोणत्या याबाबत मनसेकडून कुठल्याही अटी शर्थी नव्हत्या. मात्र शिवसेनेकडून संपूर्ण दादारवर दावा ठोकण्यात आल्यामुळे चर्चेचं घोडं अडलं. प्रसंगी दादरमध्येही सामंजस्याची भूमिका घेण्याची मनसेची भूमिका होती.