www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दरवाढ आणि मालवाहतुकीचा दर पुन्हा वाढविला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ही भाडेवाढ येत्या ७ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ती २ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.
या भाडेवाढीतून या वर्षाच्या राहिलेल्या सहा महिन्यांत रेल्वे १२५० कोटी रूपये जमा करणार आहे; पण उपनगरीय आणि बिगर उपनगरीय भाडे मात्र वाढविले जाणार नाही. रेल्वे इंधनाच्या किमतीतील तडजोड घटक यंत्रणा (एफएसी) अंतर्गत ही भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०११-१२च्या रेल्वे अर्थसंकल्पात या तरतुदीची घोषणा करण्यात आली होती. डिझेलमधील दरवाढीमुळे रेल्वेवर ७.३ टक्के अधिक बोजा पडत असून, वीजदरवाढीमुळे १५ टक्क्यांचा बोजा वाढत आहे. हा विचार करून भाडेवाढीचा हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एसी आणि स्लीपर श्रेणीचे भाडे २ टक्क्यांनी वाढण्यात येणार आहे.
मालवाहतुकीचा दर १.७ टक्क्यांनी वाढणार आहे. सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन १ ऑक्टोबरपासून सर्व प्रकारच्या मालवाहतुकीवर १५ टक्के लेव्ही लावण्यात आली आहे; तर एफएसी अंतर्गत भाडे व दरवाढ १० ऑक्टोबरपासून लागू होईल. बाजारातील स्थितीनुसार दर ६ महिन्यांनी प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचा दर वाढविण्यात येणार असल्याचे सूचित केले गेले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.