15 जूनपासून बदलतेय तात्काळ बुकिंगची वेळ

वातानुकुलित आणि बिगर-वातानुकुलित वर्गांच्या तात्काळ बुकिंगच्या वेळेत 15 जूनपासून बदल होतोय. रेल्वे प्रशासनाने वेबसाईट तसेच तिकीट खिडक्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललंय. सध्या तात्काळ तिकीट बुकिंग एक दिवस अगोदर सकाळी 10 वाजता सुरू होते.

Updated: Jun 14, 2015, 03:47 PM IST
15 जूनपासून बदलतेय तात्काळ बुकिंगची वेळ  title=

दिल्ली : वातानुकुलित आणि बिगर-वातानुकुलित वर्गांच्या तात्काळ बुकिंगच्या वेळेत 15 जूनपासून बदल होतोय. रेल्वे प्रशासनाने वेबसाईट तसेच तिकीट खिडक्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललंय. सध्या तात्काळ तिकीट बुकिंग एक दिवस अगोदर सकाळी 10 वाजता सुरू होते.

15 जूनपासून तात्काळ तिकीट बुकिंग वातानुकुलित वर्गासाठी सकाळी 10 वाजता तर बिगर-वातानुकुलित वर्गासाठी सकाळी 11 वाजता सुरू होईल अशी रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सर्व्हरवरील ताण कमी करून बुकिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी हे बदल केले आहेत. सध्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तासाला 10 ते 12 हजार तिकीटं बुक होतात. वातानुकुलित आणि बिगर-वातानुकुलित वर्गांच्या बुकिंगच्या वेळा बदलल्यामुळे तिकीट खिडकी तसेच वेबसाईटवरील ताण कमी होईल असंही ते म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.