www.24taas.com, नवी दिल्ली
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईच्या आगीत तेल ओतण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली, आता नव्या वर्षात रेल्वे प्रवास महाग झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांनी आज येथे केली.
गेल्या दहा वर्षात रेल्वेच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली नसल्याचे बन्सल यांनी यावेळी सांगितले. ही भाडेवाढ येत्या २१ जानेवारीपासून लागू होणार असल्याचे बन्सल यांनी सांगितले.
रेल्वे मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- - रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा रेल्वेच्या खर्चात वाढ झाली पण भाडेवाढ मात्र करण्यात आली नाही
- सेकंड क्लास (उपनगरी) – २ पैसे प्रति किलोमीटर
- सेकंड क्लास (विना उपनगरी) ३ पैसे प्रति किलोमीटर
- सेकंड क्लास मेल आणि एक्स्प्रेस ४ पैसे प्रति किलोमीटर
- स्लीपर क्लासमध्ये ६ पैसे प्रति किलोमीटर दरवाढ
- एसी चेअर कारच्या दरांत १० पैसे प्रति किलोमीटर दरवाढ
- एसी टू टीअरच्या दरांत ६ पैसे प्रति किलोमीटर दरवाढ + यापूर्वी १५ पैसे वाढ
- एसी थ्री टीयरच्या दरांत १० पैसे प्रति किलोमीटर दरवाढ
- एसी फर्स्ट क्लासच्या दरांत ३ पैसे प्रति किलोमीटर दरवाढ + यापूर्वी १० पैसे वाढ
- एसी फर्स्ट एक्झीकिटिव्ह क्लासच्या दरांत १० पैसे प्रति किलोमीटर दरवाढ + यापूर्वी ३० पैसे वाढ
- गेल्या दहा वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही
- २१ जानेवारीपासून होणार रेल्वेची भाडेवाढ