www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला. मात्र, तेलंगणा राज्याच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ झाल्याने लोकसभा स्थगित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेले नाही. तर १७ नवीन एसी गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेय. तर ३८ एक्सप्रेस गाड्यांची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.
तेलंगणा राज्याच्या मुद्द्यावर चिरंजीवी, के.एस.राव, सूर्यप्रकाश रेड्डी, पुरुंदेश्वरी यांनी संसदेच्या वेलमध्ये गोंधळ घातल्याने खरगे यांना पूर्ण रेल्वेअर्थसंकल्प सादर करता आला नाही. या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
रेल्वे ही राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. तर रेल्वे कर्मचारी कठीण परिस्थितीत काम करीत आहेत. देशाच्या विकासासाठी रेल्वे एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे रेल्वेसाठी रोडमॅप तयार व्हावा, अशी इच्छा मल्लिकार्जुन यांनी अर्थसंकल्पाच्यावेळी व्यक्त केली.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
- प्रवासी भाडेवाढ नाही, मालवाहतुकीतदेखील भाडेवाढ नाही
- २२०७ किलोमीटरच्या नवीन लाईन
- वैष्णौदेवीसाठी लवकरच रेल्वेसेवा सुरू होणार.
- केवळ चार महिन्यांसाठीचा रेल्वे अर्थसंकल्प
- रेल्वेच्या इतिहासात रेल्वेने सहावा वेतन आयोग लागू केला आहे.
- रेल्वे अर्थसंकल्पात ३८ नव्या एक्स्प्रेस गाड्या
- दहा नव्या पॅसेंजर, तर १७ नव्या प्रीमियर गाड्यांची घोषणा
- प्रवासी भाड्यात कोणतेही बदल नाहीत
- ईशान्य भारतात रेल्वेचे जाळे वाढविण्यावर भर
- मेघालय राज्यात नवे रेल्वे मार्ग
- जम्मू काश्मीरमधील कटरापर्यंत पॅसेंजर रेल्वे सुरु करणार
--पॅंट्री कारमध्ये इंडक्शन कुकरचा वापर केला जाणार
हायस्पीड ट्रेन्स
जपान इंटरनॅशनल कॉरपोरेशन एजंसीच्या अर्थसाहाय्याने मुंबई आहमदाबाद कॉरिडोरसाठी भारत आणि जपान यांचा संयुक्त अभ्यास गट स्थापन करणार तसंच मुंबई आहमदाबाद कॉरिडोरच्या उद्योग विकासासाठी अभ्यास फ्रान्सची राष्ट्रीय रेल्वे कंपनी अभ्यास करणार... तासाला १६०-२०० किलोमिटर वेगाने कमी किंमतीच्या पर्यायी मार्गांचा शोध घेणार...
एक्सटेन्शन आणि फेऱ्या वाढवण्याबाबत
* तीन एक्सटेंशन ट्रेन्स
* तीन ट्रेन्सच्या फेऱ्या वाढविणार
पुढाकार आणि पूर्ण झालेले धेय्य
* काश्मीर ते कन्याकुमारी हा राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण झाला.
* मेघालय आणि अरूणांचल प्रदेश एकमेकांना जोडण्याचा प्रकल्प
* ५१० किमी लांबीचा रांगिया-मुर्गोंसेल्क मार्गाचे पद्धतशीरपणे गेज रूपांतर करण्यात येईल.
* पंचवार्षिक धोरणानुसार २२०७ किमीचे नविन रेल्वे मार्ग, २,७५८ किमी लांबीच्या रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण, ४५५६ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण,
सुरक्षेसाठी मुख्य बदल
* रेल्वे क्रॉसिंगवर कर्मचारी नेमणार, एकूण ५,४०० कर्मचारी रेल्वे क्रॉसिंगवर नसणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर पर्यायी सुविधा उभारणार
* रेल्वे येण्यापूर्वी होणाऱ्या घोषणांमध्ये सुधारणा करणार
* रेल्वे अपघातांना आळा घालण्यासाठी यंत्रणा उभारणार
* रेल्वे डब्यांचा दर्जा सुधारणार
* क आणि ड श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार
* आग प्रतिबंधकांची संख्या वाढवणार
* शार्टसर्किट रोखण्यासाठी मल्टी टायर विद्युत संरचनेचे संरक्षण तयार केल जाईल
* आग प्रतिबंधक छोटे-छोटे यंत्रे रेल्वेच्या डब्यात बसवण्यात येईल
* गॅसचा वापर टाळून रेल्वेच्या किचनमध्ये इंडक्शनबेस कुकिंगचा पर्याय वापरणार
* स्फोटक पदार्थांच्या तपासणीसाठी यंत्रणा उभारणार
पर्यावरणविषयी
* ऊर्जा मंत्रालयाकडून रेल्वेच्या पवनउर्जा प्रकल्प , सौर उर्जा प्रकल्प, यांना ४०% अनुदान मिळणार
* २०० स्टेशनस् ,२६ इमारतींचे टेरेस, २००० लेवल क्रॉसिंग यांना सौर उर्जा प्रकल्पासाठी वापरण्यात येईल.
* ५१ जन आहार केंद्रावर उभारणार, प्रवाश्यांच्या बसण्याच्या खुर्चांचा दर्जा सुधारणार
माहिती तंत्रज्ञान
* स्वयंचलित तिकीट यंत्र, प्रवासी तिकीटांचे बुकिंग, मोबाईलद्वारे तिकीट काढण्याचे तंत्रज्ञान विकसीत करणार
• इतर ताज्