www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची अपेक्षा आहे. नव्या रेल्वेगाड्या, नवे रेल्वेमार्ग आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेमंत्र्यांकडून काही महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.
निवडणुकीपुर्वीचे अंतरिम बजेट आज केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे सादर करणार आहेत. काही महिन्यावर आलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता या बजेटमध्ये कोणतीही प्रवासी भाडे होण्याची शक्यता नाही. तसंच काही नव्या रेल्वेंची घोषणा रेल्वे मंत्री करण्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या सुरक्षेलाही या बजेटमध्ये प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईतल्या लोकलसाठी रेल्वेमंत्री काय घोषणा करणार याकडेही लक्ष लागलंय. मात्र निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता या बजेटमध्ये कोणतीही क्रांतीकारक घोषणा होण्याची शक्यता नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.