दिल्ली बलात्कार प्रकरण : निर्भयाची हत्या केली नसती पण...

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या गँगरेप प्रकरणातील एका आरोपीला, अजूनही त्याने केलेल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप झालेला नाही.

Updated: Mar 3, 2015, 04:58 PM IST
दिल्ली बलात्कार प्रकरण : निर्भयाची हत्या केली नसती पण... title=

नवी दिल्ली : दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या गँगरेप प्रकरणातील एका आरोपीला, अजूनही त्याने केलेल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप झालेला नाही.

बलात्काराचा आरोप असलेल्या मुकेश सिंहने गँगरेप प्रकरणी मुलीलाच दोषी ठरवलं आहे, एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुकेशने म्हटलंय की,अशा घटनांना मुलांपेक्षा मुली जास्त जबाबदार असतात.

तिने शांत रहायला हवं होतं- आरोपी
तिहार जेलमध्ये बंद असलेल्या मुकेश सिंहची बीबीसीने एक मुलाखत घेतली आहे, यात मुकेश सिंह म्हणतो, निर्भया जर गुपचूप राहिली असती, तिने विरोध केला नसता, तर तिचा जीव वाचला असता. ज्या मुलीवर बलात्कार होतो, ती मुलगी त्या मुलापेक्षा जास्त जबाबदार असते.

काय होती घटना?
१६ डिसेंबर २०१२ रोजी ३२ वर्षांच्या निर्भयावर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर पाच जणांनी तिची अतिशय क्रूरपणे हत्या केली, यातील मुकेश हा बस चालवत होता, तो देखिल यात सामिल होता.

बीबीसी डॉक्यूमेंन्टीत दिलेल्या मुलाखतीत मुकेस म्हणतो, जर त्यावेळी तिच्या मित्रांनी आमच्याशी भांडण केलं नसतं,  तर तिला असं मारलं नसतं की थेट तिचा जीव जाईल.

तिला रस्त्यावर कुठेतरी सोडून दिलं असतं.
रेप आणि हत्या ही एक घटना असल्याचं सांगून मुकेश म्हणतो, जेव्हा बलात्कार होत होता, तेव्हा निर्भयाने विरोध करायला नको होता. त्यावेळी तिने शांत रहायला हवं होतं, आम्ही जे करत होतो, ते करू द्यायला हवं होतं. तिने विरोध केला नसता तर आम्ही तिला रस्त्यावर कुठेतरी सोडून दिलं असतं.

निर्लज्जपणाची हद्द
मुलाखतीत मुकेश आणखी निर्लज्जपणाची हद्द पार करत म्हणतो, एक चांगल्या घरातली मुलगी रात्री ९ नंतर घराच्या बाहेर पडत नाही. मुलगी बलात्कारासाठी जास्त जबाबदार असते, मुलगा-मुलगी समान नाहीय, मुलींनी घरातली कामं करावीत, डिस्कोला जाणं, बारमध्ये जाणं, चुकीची कामं करणं, चुकीचे कपडे परिधान करणे यामुळे हे होतं.

मुकेश आणखी बडबडतो, फक्त २० टक्के मुली बरोबर आहेत, या मुलाखतीत महिलांचे अधिकार आणि भारतीय महिलांविषयी भारतीय पुरूषांचा दृष्टीकोन दाखवला जाणार आहे.

बलात्कार केल्याचा नकार
मुकेश हा २६ वर्षांचा ड्रायव्हर बलात्काराची घटना झाली तेव्हा बस चालवत होता, असं सांगून निर्भयावर आपण हल्ला केला नसल्याचं त्याने कोर्टात सांगितलंय, मात्र कोर्टाने त्यांच्या विरोधातील महत्वाचे पुरावे पाहून त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गृह मंत्रालयाने या मुलाखतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निर्भयाचे आई-वडिल काय म्हणतात.
मुकेश सिंहच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, पीडिताच्या आई-वडिलांनी आपला दृष्टीकोन ठेवला आहे. पीडीताच्या आई-वडिलांनी ही मुकेशची बडबड असल्याचं म्हटलं आहे. या एक गंभीर अपराध आहे, आरोपीचं वक्तव्य आमच्यासाठी महत्वाचं नाही. आपल्या न्यायव्यवस्थेत कुठेतरी काहीतरी कमी आहे, यामुळे आरोपी सुटतात, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.