भ्रष्टाचारात भाजपचा विश्वचषक - राहुल गांधी

कर्नाटकातल्या भाजप सरकारनं भ्रष्टाचारात विश्वचषक जिंकला असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 1, 2013, 08:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,बंगळुरू

कर्नाटकातल्या भाजप सरकारनं भ्रष्टाचारात विश्वचषक जिंकला असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.
राहुल गांधी यांनी आज बेळगावमध्ये सभा घेतली. यावेळी काँग्रेसचा प्रचार करताना भाजपला टार्गेट केलं. त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या भाजप नेत्या सुषमा स्वराज या बाबतीत काहीच का बोलत नाहीत, असा सवालही उपस्थित केला. जनतेत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न न करणारे खासदार बदलले जातील, असंही त्यांनी जाहीर केलं.

कर्नाटक विधानसभेची यंदाची निवडणूक आतापर्यंत निवडणुकांपेक्षा सर्वार्थानं वेगळी आहे. तीन मुख्य पक्षांमध्ये रंगणारी पारंपरिक लढत यावेळी बहुरंगी झालीय.त्यामुळं राज्यातल्या छोट्या पक्षांनाही महत्व आलंय.
राज्यातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाववर वर्चस्व असणा-या महाराष्ट्र एकीकरण समितीनं अपेक्षित यश मिळवलं तर सत्तेच्या चाव्या एकीकरण समितीच्या हाती लागण्याची शक्यता आहे.