राहुल प्रियांकाच्या मुलाला दत्तक घेणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी आपली बहिण प्रियांका गांधी यांच्या मुलाला - रेहानला दत्तक घेणार असल्याच्या बातम्यांनी सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिल्या जात आहेत. 

Updated: Jul 26, 2014, 03:03 PM IST
राहुल प्रियांकाच्या मुलाला दत्तक घेणार? title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आपली बहिण प्रियांका गांधी यांच्या मुलाला - रेहानला दत्तक घेणार असल्याच्या बातम्यांनी सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिल्या जात आहेत. 

नेहरु-गांधी घराण्याच्या राजनैतिक उत्तराधिकाऱ्याच्या शोधात सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये ही बातमी जोर धरतेय. राहुल प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वडेरा यांचा मुलगा रेहान याला दत्तक घेऊन त्याचं नाव बदलून आडनावत 'गांधी' असा बदल करणार असल्याचंही म्हटलं जातंय.  

इंग्रजी दैनिक 'द संडे गार्डियन'नं दिलेल्या बातमीनुसार, देहरादूनच्या 'दून' शाळेत काही काळापूर्वी प्रवेश घेणार रेहान आपलं आडनाव 'गांधी' असं वापरतोय. इतर विद्यार्थ्यांनी याबद्दल रेहानला कारणं विचारण्यास सुरुवात केल्यानंतर त्यानं पुन्हा 'वडेरा' हेच आडनाव वापरण्यास पुन्हा सुरुवात केली. 

उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयापासून मामा-भाच्याबद्दल चाललेल्या या चर्चांना पेव फुटलंय. या दरम्यान राहुल रेहानला फिरायला घेऊन गेले होते. मामा-भाचे एकमेकांसोबत मोकळेपणाने वावरताना दिसतात. काँग्रेसच्या एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या रेकॉर्डमध्ये राहुलचंच नाव रेहानचा 'पालक' म्हणून लावण्यात आलंय. कुटुंबाला मिळालेल्या खास सुरक्षाच्या कारणास्तव ही गोष्ट गोपनीय ठेवण्यात येतेय.  

उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अविवाहीत आहेत आणि भविष्यातही विवाह करण्याबद्दल त्यांची अजून कोणतीही योजना नाही. बऱ्याचदा, राहुल गांधी यांचे काही तरुणींशी संबंध असल्याच्याही बातम्या समोर येत असतात. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.