www.24taas.com, कोलकाता
उद्योगक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ उद्योजक आर. पी गोयंका यांचे रविवाही पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
विजेपासून संगीताच्या कॅसेटस निर्मितीचा त्यांनी उदयोग सुरू केला. केशवप्रसाद गोयंका यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या आर. पी. गोयंका यांनी कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार केला. टायर, कार्बन ब्लॅक, वीज उद्योग, औषधी कंपन्या, आय. टी.क्षेत्रासह संगीत क्षेत्रातही अनेक उद्योग त्यांनी उभारले. त्यांच्या पश्चायत पत्नी सुशिला आणि हर्षवर्धन व संजीव हे दोन पुत्र आहेत.
कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी इतिहासाची पदवी घेतली. त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम पूर्ण केले. १९७९ साली त्यांनी आरपीजी एन्टरप्रायझेसची स्थापना केली. फिलीप्स कार्बन ब्लॅक, एशियन केबल्स, अगरपुरा ज्यूट मिल्स आणि मर्फा इंडिया या कंपन्याची स्थापना केली.