'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असल्याने,  70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नाहीत, असं एका आर्थिक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.

Updated: Feb 28, 2016, 10:57 PM IST
'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती title=

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असल्याने,  70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नाहीत, असं एका आर्थिक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.

देशातील निम्म्यापेक्षा अधिक पीएफ खात्यांमध्ये मागील तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार झाला नसल्याने ती खाती निष्क्रिय असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

पैशांची उणीव आणि मिळालेला पैसा पटकन खर्च करावेसे वाटत असल्याने 70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यात इच्छुक नसतात. याशिवाय पीएफ रक्कम काढण्यासाठी असलेली किचकट प्रक्रियाही अनिच्छेचे कारण असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय पैसे काढताना लागणारे शुल्क हे देखील कारण असल्याचे सर्व्हेमध्ये आढळून आले आहे.

आर्थिक सर्व्हेक्षण 2015-16 च्या एका पाहणीमध्ये ही माहिती आढळून आली आहे.  विशेष म्हणजे नेहमीच नोकरी बदलणाऱ्या व्यक्तींना पैसे काढण्याच्या किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यामुळे पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचारी नापसंती दर्शवित आहेत.