हत्तीचं असं रौद्ररूप तुम्ही यापूर्वी पाहिलेलं नसेल

या व्हिडीओ हत्ती आपल्या सोंडेने बाईक आणि रिक्षा उचलून आदळतोय.

Updated: Feb 28, 2016, 07:14 PM IST
हत्तीचं असं रौद्ररूप तुम्ही यापूर्वी पाहिलेलं नसेल title=

केरळ : हत्तीचा संताप यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल. या व्हिडीओ हत्ती आपल्या सोंडेने बाईक आणि रिक्षा उचलून आदळतोय, पिक व्हॅनलाही हत्तीने एका दमात दूरपर्यंत फेकलंय. हत्तीचं असं रौद्र रूप तुम्ही यापूर्वी कधीच पाहिलं नसेल.

(व्हि़डीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

या हत्तीचं नाव देवीदासन असल्याचं सांगण्यात येतंय. केरळमधील पुल्लापट्टामध्ये नालुसरीत, भगवती देवीच्या मंदिरात समारोह सुरू होता, तेव्हा हा हत्ती बिछडला. या हत्तीवर दोन माहुत देखील बसले आहेत, पण तो कुणाच्याच आवाक्यात येत नसल्याचं दिसतंय. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.