उत्तराखंड : राष्ट्रपती राजवटीबाबत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती 3 मे पर्यंत कायम ठेवली आली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागूच राहणार आहे. 29 एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठरावदेखील आता होणार नाही.
27 मार्चला केंद्र सरकारनं उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. 28 मार्चला हरीष रावत सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार होतं. उत्तराखंड राज्याच्या अर्थसंकल्पावरील मतदानावेळी काँग्रेसच्याच 8 आमदारांनी विरोधात मतदान केल्याच्या घटनेनंतर केंद्रानं तिथं राष्ट्रपती राजवट लागू कऱण्याचा निर्णय़ घेतला होता. उत्तराखंडच्या विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीनं अर्थसंकल्प संमत केल्याचा दावाही काँग्रेसनं केला.