www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
आपलं भारतीय चलन नोटांवर काही लिहू नका, नोटांवर न लिहिण्याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी वाराणसी इथं दिली. मात्र १ जानेवारीपासून ज्यावर लिहिलं आहे अशा नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
चक्रवर्ती म्हणाले की, नोटेवर काही न लिहिण्याबाबत लोकांना समजावण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. एवढंच नव्हे तर बँकेत एखादी व्यक्ती नोटेवर काही लिहितांना आढळली तर ती नोट न घेण्याचे आदेश बँक कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, असंही चक्रवर्ती यांनी सांगितलं. शिवाय असं करण्याचं कारण म्हणजे ती व्यक्ती पुन्हा ती चूक करु नये यासाठी असल्याचंही चक्रवर्ती म्हणाले.
कोणत्याही चेकवर काही खोडलेलं असेल, तर तसा चेक बँकेत स्वीकारला जाणार नाही, हा नियम येत्या १ जानेवारीपासून लागू होणार असल्याचं चक्रवर्ती यांनी सांगितलं. प्रत्येक बँक कर्मचारी विशेष म्हणजे बँकेच्या कॅशिअर्सना विशेष आदेश देण्यात आले आहेत. ते सुद्धा नोटांवर आता काही लिहिणार नाहीत. देशात प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरू करण्याबाबत विचारलं असता चक्रवर्ती म्हणाले की, पहिले या नोटा प्रयोग म्हणून चालविल्या जातील. जर याला यश मिळालं तर संपूर्ण देशात प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरू करता येईल. या पूर्ण प्रक्रियेला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.