मोपा विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचं पणजीत आगमन झालंय.. 

Updated: Nov 13, 2016, 11:45 AM IST
मोपा विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन title=

पणजी : पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचं पणजीत आगमन झालंय.. 

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची ही पहिलीच सार्वजनिक सभा आहे. त्यामुळे पंतप्रधान याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

तर दुसरीकडे गोवा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने भाजपासाठी हा सभारंभ राजकीय दृष्टीने महत्वाचा आहे. उत्तर गोव्यातल्या मोपा इथं हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असून त्याचा लाभ गोव्यासह शेजारच्या राज्यांना होणार आहे.