मिठाची अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना अटक

भारतात मिठाचा तुटवडा निर्माण झालाय... आणि त्यामुळे लवकरच मीठही महाग होणार आहे... त्यामुळे आजच घरात मिठाचा साठा करून ठेवा... अशा आशयाच्या अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Nov 12, 2016, 08:25 PM IST
मिठाची अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना अटक  title=

गाझियाबाद : भारतात मिठाचा तुटवडा निर्माण झालाय... आणि त्यामुळे लवकरच मीठही महाग होणार आहे... त्यामुळे आजच घरात मिठाचा साठा करून ठेवा... अशा आशयाच्या अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलीय.

सुट्ट्या पैशांची वानवा भासत असल्यानं शुक्रवारी भारतातील इतर ठिकाणांप्रमाणेच मुरादाबादमध्येही अफवा मीठाची पसरलेली दिसली. विशेष म्हणजे, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडाच्या काही भागांत ही अफवा जोरदार प्रमाणात पसरवली जात होती.

यामुळे, मुरादाबादमध्ये मिठाची किंमत 200 रुपये किलोपर्यंत पोहचली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अफवा पसरवण्यासाठी 13 जणांना अटक केली.