नवी दिल्ली : बीएसएफ जवान तेज बहादुरने व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावरुन देशभरात चर्चा रंगू लागली. वरिष्ठ अधिकारी जवानांना चांगल्या दर्जाचं जेवन देत नसल्याचा आरोप जवानाने केला होता. या प्रकरणात आता पीएमओने रिपोर्ट मागितला आहे.
बीएसएफ जवान तेज बहादुर यादवने फेसबूकवर हा व्हिडिओ शेअर केला होता. बीएसएफच्या मोठ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केले होते. सरकारद्वारे दिलं जाणारं राशन आणि इतर वस्तू जवांनासाठी पाठवले जाते पण काही मोठे अधिकारी हे विकतात असा गंभीर आरोप या जवानाने केला होता.
गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जेवनाच्या दर्जावर लक्ष देण्याचं सांगण्यात आलं आहे. या बैठकीत गृह सचिव, NSA अजित डोभाल, IB चीफ, रॉ चीफ सह गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.