वडोदरा : काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. सर्जिकल स्ट्राईकसारखी रणनिती जर काळ्या पैश्यांबाबत अवलंबली तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
काळ्या पैश्यांसंदर्भात दिलेल्या मुदतीत 65 हजार कोटींची वसुली तर 36 हजार कोटींची सबसिडी चोरी आपण थांबवली. सर्जिकल स्ट्राईक न करताच आपण 1 लाख कोटींची वसूली केली. समजा काळ्या पैश्यांवर सर्जिकल स्ट्राईक केली तर काय बाहेर येईल याची कल्पना करा असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.