मोहम्मद कैफच्या ट्विटला मोदींनी असं दिलं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देईल असा कोणताही नेता अजून तरी कोणत्या पक्षात दिसत नाही. सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा हे मोदींना नक्की माहिती आहे. ऐवढंच नाही तर कोणत्या परिस्थितीत कोणते शब्द आणि वाक्य वापरायचे देखील मोदींना खूप चांगल्या प्रकारे जमतं.

Updated: Mar 13, 2017, 10:17 AM IST
मोहम्मद कैफच्या ट्विटला मोदींनी असं दिलं उत्तर title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देईल असा कोणताही नेता अजून तरी कोणत्या पक्षात दिसत नाही. सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा हे मोदींना नक्की माहिती आहे. ऐवढंच नाही तर कोणत्या परिस्थितीत कोणते शब्द आणि वाक्य वापरायचे देखील मोदींना खूप चांगल्या प्रकारे जमतं.

शनिवारी उत्तर प्रदेशच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने मोठं यश मिळवलं. या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.  मोहम्मद कैफ काँग्रेस पक्षामध्ये आहे. ३६ वर्षाच्या या खेळाडूने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील फूलपुर येथून काँग्रेसच्या टिकीटावर निवडणूक लढवली होती.

मोहम्मद कैफला उत्तर देतांना पंतप्रधान मोदींनी कैफला धन्यवाद म्हटलं आणि हे समर्थन पक्षासाठी ऐतिहासिक ठरेल असं देखील म्हटलं.