www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
पुन्हा एकदा सहमतीने संबंध ठेवण्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण न्यायालयाने सहमतीने संबंध ठेवण्याबाबत केंद्र सरकार नोटीस बजावली आहे. केंद्राने आधी १६ वर्षे निश्चित करण्याचे म्हटले होते. परंतु प्रखर विरोध झाल्यानंत निर्णय मागे घेतला. आता १८ वर्षेच वय असावे, अशी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीचे वय १८ वर्षे असावे, अशी मागणी करणारी याचिका `आय थॉट` या समाजसेवी संस्थेनी केली आहे. त्यावर केंद्र सरकारने मत मांडावे, अशी नोटीस सर्वोच्य न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी बजावली.
‘आय थॉट’ या संस्थेच्या याचिकेत भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५मध्ये सुधारणा करण्याचे सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. यामध्ये पतीशी शारीरिक संबंधासाठी पत्नीची सहमती असण्याच्या वयोमर्यादेविषयी हरकत घेण्याचे कलम आहे. कलम ३७५च्या या हरकतीमध्ये अलीकडेच गुन्हेगारी कायदा संशोधन अध्यादेश २०१३अंतर्गत सुधारणा केली होती. यामध्ये एखाद्या व्यक्तीने १५ वर्षांपेक्षा कमी वय नसलेल्या आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवल्यास, तो बलात्कार नसेल, असे म्हटले होते.
दरम्यान, व्यक्तीला सज्ञान मानण्याचे वय कायद्यानुसार १८ वर्षे असल्याने पत्नीचे शारीरिक संबंधांचे वयही १८ वर्षेच करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. प्रौढत्वासाठी जर वयाचे १८ वर्ष निर्धारित करण्यात आले असेल, तर हेच वय महिलेसाठी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही असले पाहिजे, याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.