महागाईचा धक्का: पेट्रोल ३.१३, डिझेल २.७१ रुपयांनी महागलं

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं कारण देत इंधन कंपन्यांनी १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीय. आता पेट्रोलचे दर तब्बल ३ रुपये १३ पैसे, तर डिझेलचे भाव २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहेत.

Updated: May 15, 2015, 10:47 PM IST
महागाईचा धक्का: पेट्रोल ३.१३, डिझेल २.७१ रुपयांनी महागलं title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं कारण देत इंधन कंपन्यांनी १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीय. आता पेट्रोलचे दर तब्बल ३ रुपये १३ पैसे, तर डिझेलचे भाव २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहेत.

आज रात्रीपासूनच पेट्रोल, डिझेलचे हे वाढीव दर लागू होतील. या दरवाढीमुळं सामान्य नागरिकावर पुन्हा एकदा महागाईचा मार बसलाय. चारही बाजूंनी आता सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. 

यापूर्वी १ मेपासून पेट्रोलच्या दरात ३ रुपये ९६ पैशांनी वाढ झाली होती. त्यानंतर आज झालेल्या भाववाढीनंतर एकूण ७ रुपयांनी पेट्रोलचे दर भडकले आहेत. तर डिझेलच्या दरात २ रुपये ३७ पैशांनी वाढ झाली होती. त्यामुळे डिझेल सुमारे ५ रुपयांनी महाग झालं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.